Posts

समकालीन 'विषमकाला'ची चंदेरी बखर - मिडनाईट मॅटिनी

Image
          अमोल उदगीरकर हे नाव फेसबुक ब्लॉग्ज यासारख्या समाज माध्यमांमध्ये संचार असणाऱ्या मराठी सिनेरसिकांना नवं नाही. फेसबुकवरील अतिशय गाजलेली 'न- नायक' ही लेखमालिका अनेकांना आजही आठवत असेल, जी पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. न-नायक पण वाट्याला आलेल्या काही कलाकारांचा जीवनपट यात चितारला होता. मराठीमध्ये अशा प्रकारचं लेखन याआधी फारसं झालं नव्हतं ती उणीव या लेखांनी काही प्रमाणात भरून काढली. उदगीरकर यांचंच दुसरं पुस्तक मिडनाईट मॅटिनी मार्च- २०२३ मध्ये रसिकांच्या भेटीला आलं आहे. या पुस्तकाचंही खूप चांगलं स्वागत झालं. सिनेमा या विषयाला वाहिलेल्या पण विस्तृत परीघ असलेल्या काही लेखांचं संकलन असं या पुस्तकाचं थोडक्यात स्वरूप आहे. हे लेख बव्हंशी मुक्त चिंतनात्मक आहेत. लेखकाच्या विचारांचं, धारणांचं लख्ख प्रतिबिंब या लेखांमध्ये पडलेलं दिसतं. यातल्या एका लेखात शिरीष कणेकर यांचं एक मार्मिक वाक्य उद्धृत केलं आहे - "बाहेरच्या उजेडात पाहण्यासारखं काही राहिलं नाही, तेंव्हा आमच्या मनातला काळोख आम्ही थिएटरातल्या काळोखात बेमालूमपणे मिसळून टाकला." सर्वसामान्य भारतीय सिनेरसिकांची स...

संथा

एक नवीन सुरुवात, uncharted territories (माझ्यासाठी) मध्ये पाऊल टाकण्याची संथा का म्हणा ना. काही विषयांवर लिहावं असं डोक्यात आहे. सध्या तरी उथळ पाण्यातच हात पाय मारायचा मानस आहे. साहित्य संगीत सिनेमा या whatsapp समुहा वरच्या माझ्या अभ्यासू आणि सर्वार्थाने बहुश्रुत अशा मित्रांच्या प्रेरणेने हे धाडस करावं असं वाटतंय. लवकरच सविस्तर पोस्टसह भेटीला येईनच. इत्यलम्!